नाट्यछटा

[वाचनकाल : १ मिनिट]
actor and act of monolouge vector

‘दिवाकर’ उर्फ ‘श. का. गर्गे’ यांनी मराठी साहित्यात जन्माला घातलेला, रुजवलेला प्रकार म्हणजे ‘नाट्यछटा’ होत. ‘ब्राऊनिंग’ कवीच्या इंग्रजी ‘मोनोलॉक्स’मधून प्रेरणा घेऊन नाट्यछटा मराठीत अवतरल्या हे दिवाकर खिलाडूवृत्तीने मान्य करतात मात्र नंतर या नाट्यछटातून इंग्रजी लहेजा गळून पडून त्यात बावनकशी मराठी बाज आला हेही तितकेच खरे आहे. बोलणाऱ्या केवळ एकाच पात्राला हाताशी धरून, समोरच्या पात्राचे संभाषण रहस्य ठेवून अथवा पुनरावृत्तीची जोड देऊन समग्र प्रासंगिक पट वाचकांच्या डोळ्यांसमोर उभा करण्याची ताकद नाट्यछटांमध्ये आहे.

केवळ निर्मात्यालाच उत्कृष्ट जमून आला असा मराठीतील हा एकमेव साहित्यप्रकार असावा.

नाट्यछटांसाठी विषय मिळणे दुरापास्त बाब आहे. एकवेळ तुम्ही नाट्यछटांचे रूपांतर इतर साहित्यिक प्रकारांत करू शकता मात्र इतर कोणत्याही साहित्य प्रकारास ठोकून नाट्यछटांच्या साच्यात बसवू शकत नाही. म्हणून कदाचित दिवाकर यांनी ज्या, साधारण ५१, नाट्यछटा लिहिल्या तशा पुन्हा कोणाला जमून आल्या नाहीत. या सर्व नाट्यछटा कुठेतरी समाजातील ठराविक प्रस्थापित रीतींवर किंवा किडलेल्या मानवी प्रवृत्तीवर सडेतोड भाष्य करतात, प्रश्न उपस्थित करतात आणि म्हणूनच त्या आजही जिवंत भासतात. सध्याच्या या सामाजिक परिस्थितीस लागलेली उतरंड पाहता नाट्यछटा हा साहित्यप्रकार आणखी जवळचा वाटू लागतो.

इथे प्रस्तुत नाट्यछटांतून काही सामाजिक विषय मांडता येतील, काहीतरी विचार वाचकाला देता येईल व त्यासोबत नवीन काहीतरी वाचल्याचा आनंद वाटता येईल.
{fullWidth}

نموذج الاتصال