[वाचनकाल : २ मिनिटे]
{fullWidth}
‘टाकबोरू’सह वाचकांनी, लेखकांनी, आंतरजालावर बागडणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे हे ठिकाण. बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतात – विचारी असल्याने प्रश्न पडणे गैर नाही, साहजिकच आहे – खुद्द ‘टाकबोरू’ निर्मितीच्या वेळी निर्मात्यांनी प्रश्नांचा भडीमार इतर संकेतस्थळांवर केलेला होता. त्यातील काहींना प्रतिसाद आला नाही, मात्र हे ‘टाकबोरू’ कटाक्षाने टाळेल, इतर काही ठिकाणी झकपक संकेतस्थळ पाहून संपर्क साधताना मनात धाकधूक होती.
अशा भीतीला न जुमानता हरेकाने हक्काने त्यांचे प्रश्न, सूचना, माहिती, मत किंवा प्रतिसाद पाठवायचे झाल्यास किंवा इतर काही बोलावयाचे झाल्यास थेटच ‘टाकबोरू’सह संपर्क साधावा या दृष्टीने आम्ही प्रस्तुत पृष्ठास अतिशय सोप्या मांडणीत आपल्यापुढे ठेवत आहोत. ‘संपर्क अर्ज’ इत्यादी किचकट आंतरजालीय प्रक्रिया टाळून सोप्या ई-मेल वर तुम्ही निसंकोच ‘टाकबोरू’सह संपर्क साधू शकता. आपल्या मेलची दखल ‘टाकबोरू’ द्वारे घेतली जाईल व प्रतिसाद दिला जाईल.
हे करत असताना काहीवेळा गुगलमार्फत ‘टाकबोरू’चे ई-मेल आपल्या ‘स्पॅम’ किंवा ‘प्रमोशन’मध्ये जमा होऊ शकतात त्याच्याने आपणास सूचना मिळणार नाही. तीन दिवसात जर ‘टाकबोरू’चा प्रतिसाद आपणापर्यंत पोहोचला नाही तर आपल्या ई-मेल मधील वरील दोन्ही ‘फोल्डर्स’ तपासून पहावेत व जर तेथे प्रतिसाद आला असेल तर ‘टाकबोरू’स तेथून बाहेर काढून ‘प्रायमरी’मध्ये घ्यावे ही विनंती. मात्र जर तेथेही प्रतिसाद नसल्यास, तक्रारीसाठी का होईना, कोणतीही भीडभाड न ठेवता पुन्हा संपर्क साधा.
Place for readers, writers, and internet users to connect with Takboru.
Many times, people have questions, and it's natural to ask questions when you're curious. During the creation of Takboru the makers faced numerous questions, some of which were answered on other platforms. However, not every one question received a response. Despite this, Takboru encourages communication and suggests contacting them through various means if you have questions, information, or feedback.
They emphasize the importance of contacting them directly, and they provide an easy process through an online form like Contact Form to send an email. They mention that due to email filters, responses might end up in spam or promotions folders. Therefore, if you don't receive a response within three days, we suggest checking these folders.
{fullWidth}