
क्रांतीची पाच बोटं: लेखन, वक्तृत्व, नाट्य, संगीत, सिनेमा. ही पाची बोटं एकत्र आली की – क्रांतीची वज्रमुठ. या वज्रमुठीच्या जोडणीखातर नवं ब्रीद ‘मंच तिथे विद्रोह’ आणि या ब्रीदास खतपाणी घालणारा नवा प्रकार ‘ओपन माईक’. नावातच सगळं आहे. बऱ्याच ठिकाणी एकटा उगवत असल्याने रेकॉर्डींग नसतात अपवाद २७फेब्रुवारीचा ओपन माईक . . .
वाचनात वेळ दवडायचा नसेल तर खाली जाऊन थेट ऐका. तसंही हे लिखाण प्रास्ताविक आहे फक्त.
ओपन माईकच्या अनुभवांवर आणि कार्यप्रणालीवर तसेच त्याच्या परिणामांवर वेगळा लेख लिहीन. या मधील दोन्ही अप्रकाशित कविता ‘कला(कार) कातडीबचाऊ वांझ’ आणि ‘पण कपडे नक्की गेले कुठे’ येत्या दिवसात प्रकाशित करणेही आहे (तेव्हा त्याचे दुवे इथे जोडून ठेवेन). ‘विकास’ नावाचं स्फुट मात्र प्रकाशित आहे (दुवा श्रवणीयच्या शेवटी).
हे साहित्य किंवा इतरही साहित्य चांगल्या आवाजात (हे साधणं अवघड!) आणि थोड्याबहुत आवश्यक संगीतासह सुद्धा ‘श्रवणीय’मध्ये येईल. पण त्या मंचावरील तत्कालिक क्षणांची मजा वेगळी असते म्हणून हा प्रपंच.
खरंतर ही ‘ट्वीटर’वरील ‘स्पेस’ होती ज्यातील माझ्या तीन सादरीकरणाचे हे भाग आहेत. पूर्ण ‘स्पेस’चा दुवा खाली नमूद आहे. सुरुवातीचं निवेदन ‘cinephiles’चं आहे. सादरीकरणातील आणि आवाजातील (हे माझ्या हातात नाही!) चुका क्षम्य. आणि इथून पुढचे ‘ओपन माईक’ संग्रहित करण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद.
उत्तम अनुभवासाठी हेडफोन्स् वापरायला हरकत नसावी.
{fullwidth}