
हेही हवं तेही हवं. नेहमी स्वार्थ किंवा लोभ आडवे येऊन ही मानसिकता घडवतात असं नाही. खेळण्याच्या खोलीतील बाळाला, मित्रांच्या घोळक्यातील कुमाराला, स्वप्न-जबाबदारीच्या द्विधेतील तरुणाला, स्थळ निवडीतील तरुणीला किंवा मुलांच्या निवडीतील विभक्त आई-बापाला हेही हवं तेही हवं. यात स्वार्थ-लोभ वगळता ज्या भावना आहेत अगदी त्याच संमिश्र भावनांतून मला त्या दोघीही हव्याशा वाटतात . . .
[ इथे एक छोटसं प्रास्ताविक येणे आहे. जे अजून डिजिटल झालेले नाही ते कदाचित उद्यापर्यंत आणि हे स्फुट लिखित स्वरूपात परवापर्यंत येईल. धन्यवाद. ]
तू आधी आलीस आयुष्यात माझ्या. पण मी सुरुवातीला बोललो तिच्याशी. तुझ्या नखऱ्यांआधी मी मनवलंय तिच्या लटक्या रागाला. नंतर असंही लक्षात आलं ती तुझ्यापेक्षा लाघवी आहे, तुझ्याहून जास्त भिनते; पण म्हणून मी तुझ्या डोळ्यांत, अधूनमधून पाहतो ती, करुणेची झालर विसरू शकत नाही. सांगणं असं – तू तुझ्यासारखी आहेस, ती तिच्यासारखी आणि मला तुम्ही दोघी हव्या आहात! मग माझ्यात तुमची स्पर्धा लागते, माझ्यासोबत कोणी चालत रहायचं यासाठी . . .
उत्तम अनुभवासाठी हेडफोन्स् वापरायला हरकत नसावी.
{fullwidth}