
उठा-उठा सकाळ झाली, कालची दिशाभूल शिळी झाली. आज नवा ‘फॉरवर्ड’ आलाय त्याप्रमाणे खोऱ्या, कुदळ, घमेली, खुरपी, पहारी घ्या दादांनो आपल्याला कबरी उकरायला, जमिनी खोदायला जायचंय! नोकरी-बिकरी होत राहील; पण नेत्यांची पोरं परदेशात ऐशोरामात झोपलीयेत ती उठण्याआधी ‘आपली’ कबर खोदून व्हायला हवी. जमिनी उकरू दादांनो कारण, त्याखाली आपल्या पूर्वजांवर झालेल्या अनन्वित अत्याचारांचा इतिहास दडलाय, आपली खरी संस्कृती दडलीये. समजा काही सापडलं नाही तर? तर कबरी अजून बक्कळ आहेत, जमिनी अजून खूप आहेत . . .
चला रे दादांनो कबरी खोदायाला
चला रे बाबांनो कबरी खोदायाला
विसरी पाडू घरदार करू नेत्यांचा जयजयकार
बेरोजगार सगळे येडे वाचू व्हाट्सपवरचे धडे
हुकूमशाहीचं वर्तन गुन्हेगारीचं नर्तन
विज्ञान-शिक्षणाला फाशी पुढे उभी महागाई
झुंडशाहीला घालू वाळा मायाशक्तीचा पुतळा
लोकशाहीची पाहू मजा छान लावून ब्यांडबाजा
चोराच्या उलट्या बोंबा मंत्री हानी बघा
दिल्लीपुढे तुकवी मान खोटा शक्तीमान
नक्राश्रूंचे गारदी पाठींब्या पोलीसची वर्दी
दंगली नाही घडवत तोवर त्यांना नाही करमत
‘विठाबाई दुसाने’ यांच्या मुळ ‘चला रे दादांनो गणपती बघाया’ या गीताचे हे विडंबन आहे.
उत्तम अनुभवासाठी हेडफोन्स् वापरायला हरकत नसावी.
{fullwidth}