अजूनही कित्येक अघोरी प्रथा राजरोसपणे घडवून आणल्या जात आहेत. ‘रोम्बाट’ ही अशीच एक अघोरी प्रथा आहे. केवळ सामाजिक दबावाखाली टिकवल्या जाणाऱ्या जातीव्यवस्थेचे ठळक वास्तव म्हणजे ‘रोम्बाट’. ऊन-पाऊस-वारा न जुमानता केवळ एका जातीत जन्म घेतला म्हणून होळीच्या प्रत्येक कार्याचा निरोप द्यायला घरोघरी ढोल बडवत न्यायचा, दिलं ते खायचं आणि प्रतिकार करायचा नाही म्हणजे ‘रोम्बाट’! दारू पिऊन रंगेल झालेल्यांना नाचण्यासाठी पंधरा किलोचा ढोल रात्र-रात्र गळ्यात अडकवायचा म्हणजे ‘रोम्बाट’! देवकार्याची सुरुवात तर करायची; पण शेवटाला येईपर्यंत देवळातला नियोजीत अस्पर्शित कोपरा पकडून बसायचं म्हणजे ‘रोम्बाट’! या रोम्बाटाविरूद्ध बंड करणाऱ्या तरुणाची चित्तरकथा . . .
जगभरात पसरलंय इंटरनेटचं जाळंएका क्लिक द्वारेकाही सेकंदात जगाशी होता येतं कनेक्टत्या युगात . . .प्रस्थापितांचंनागडं-उघडंशेंबडं पोरंवार्धक्याने हाडं ठिसूळझालेल्या माझ्या बापालाआदेश देत म्हणालंए म्हाताऱ्या,रोम्बाट काढायचंयपिढ्यानपिढ्या धर्माच्या ठेकेदारांनीजातीय उतरंडीची विषमता निर्माण करूनदेव धर्माच्या नावानंपोसला आहे वर्णवर्चस्ववादधु म्हटलं की धुवायचंलोंबत काय म्हणूनविचारायचं नाही पालटूननाहीतर सत्तर पिढ्यांचा उद्धारअख्खा जातसमूह झालायधर्मवाद्यांचं पायपुसणंमाझा बापजन्माची होळी निआयुष्याचा शिमगा करूनस्वातंत्र्याच्या नावानं बोंब मारतस्वाभिमान तुडवतढोल बडवतदवंडी पिटतखेड्या-पाड्यातवाड्या-वाड्यातगाव-गाड्यातकोणाच्या सुख-दुःखातकोणत्या लग्नाच्या विड्यात
कोणाच्या मैत-मड्यातकधी काट्याकुट्यातूनकधी मसनवाट्यातूनविज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात ढोल बडवत आहेपिढ्यानपिढ्यातो मान खाली घालून चालतोखरकटलेली लुगडी नेसलेल्याप्रस्थापितांच्या बायकापोरांच्या पुढ्यातधनधान्याची रास घरात असूनहीतो उकिरड्यावरच बसून खातोलावारीस कुत्र्यावाणीत्यांनी फेकलेला शिळापाका तुकडाआणि घोट-घोट पितोवरून वाढलेलं जातव्यवस्थेचं गढूळ पाणीकडाशेवरच्या कानतूटक्या कपातूनतडा गेलेल्या बशीतूनतो फुरक्या मारत पितोकळकट मळकट चहामाणूस बाटतो माणसाच्या स्पर्शानेमाणसाला माणसाच्या सावलीचाअजूनही होतो विटाळदेवाच्या कार्यात मात्रमाझ्या बापाला मिळतंसर्वात वरचं मानाचं स्थानगावकऱ्यांचं वयात आलेलं पोरमला टायकोटात सुटाबुटात पाहूनबा ला म्हणलंआता तुझ्या पोरातधर्म रुजवायला हवात्याला सुद्धा आता देवापुढेढोल वाजवायला हवापोरं शिकलं सवरलं होतंतरी थोडं बावरलं होतंहिम्मत करून म्हणलंमी ढोल वाजवणार न्हायमग तो वस्तीतबाबासाहेब पेरत गेलाफुले शाहू आंबेडकरमनामनात कोरत गेलातो म्हणालात्यांच्या पिढ्यान्पिढ्याचा माज हायतो मी पेचून काढीनआज कायद्याचं राज हायअनिष्ट रूढी परंपरा ठेचून काढीनगावाशी नडला होतासारा समाज चिडला होताव्यवस्थेच्या विरुद्ध त्यानंएक आसूड ओढला होतात्यानं हाती घेतलंदेवघरात खितपत पडलेलं भारतीय संविधानधूळ झटकलीजयभीमचा नारा दिलासारा समाज जागा झालाकधीपर्यंत जगणार हे लाचार जिणं . . . म्हणूनगुलामीच्या बेड्या झुगारून देतत्यानं बंड केलंकायद्याने व्यवस्थेला थंड केलंअज्ञान दूर सारतगावगाडा गुलामीचा वेढा तोडूनदेव्हाऱ्यातला निमनातला देव फेकून दिलाउकिरड्यावरपोथीपुराणासकटआता माझा बा,बा भीमाच्या पायवाटेने चालतो आहेअत्त दीप भवबुद्धाची वाणी बोलतो आहे
[ ही कविता भुदरगड तालुक्यातील एका गावात घडलेली सत्यकथा आहे या कवितेचा नायक ‘डॉ.अनिल कदम’ आणि सहकारी यांच्या या अघोरी प्रथेविरुद्ध केलेल्या बंडाला संपूर्ण महाराष्ट्रभर पोचवण्याचे काम या कवितेच्या माध्यमातून करण्यास मी कवी भिमराव तांबे कटीबद्ध आहे. ही प्रथा महाराष्ट्रातील ज्या-ज्या ठिकाणी चालू आहे त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधा. ]
(‘कुऱ्हाडीचे घाव’ आणि ‘परिघावरच्या कविता’ विद्रोही कवितासंग्रह प्रकाशित)
• संदर्भ• वाचत रहा