धुंद


abstract art expressing affection addiction of chai
तू सोबत असल्याचा फील


अपरिमित ध्यास घेतला की माणूस धुंदीत जातो, बेभान होतो. ही धुंद म्हणजे कैफ नाही. धुंद तर जगत असलेल्या हरेक क्षणाला समरसून अनुभवण्याची स्थिती आहे. असल्या बोटं सुन्न पाडणाऱ्या थंडीत माणूस एकतर वाफाळलेल्या चहाची धुंद अनुभवतो किंवा प्रेममय आठवणींच्या ऊबेची! या दोन्ही धुंदींचा हल्ला एकाच वेळी झाला तर?


पहाटेचा गच्च काळोख,
टपरीतला भकभक दिवा
आणखी गडद करतो . . .

हातातल्या ग्लासात वाफाळती,
तुझ्या आठवणींची ऊब
तू सोबत असल्याचा फील देते . . .

हाताला बसलेला चटका,
चटकन भानावर आणतो
बेभान धुंद होण्यासाठी . . .





{fullwidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال