काळरात्र म्हणतात ती अजून फार दूर आहे, वैऱ्याची रात्र तू कधी जाणवू दिली नाहीस, पण; ही परिस्थिती आता होती तशी उरलेली नाही. खरंतर आयुष्यात आताशा नव्यानंच उगम पावलेल्या निश्चल रात्रींच्या नावे; पण त्यांचं कारण तू म्हणजे थोडक्यात तुझ्याच . . .
कोण्या रात्री
बाप फिरतो अंगणात
माय बसते पायरीवर
मी दारात उभा
बाप शोधतो गप्पांना जोडीदार
माय काढते मावशीचा धोसरा
मी पाहतो इथून तिथे तिथून तिथे
बापाची पाठ अंथरूण मागते
मायची भांडी ओरड करतात
मी उगाच थिजून जातो
शून्यातून नजर काढून
आम्ही एकमेकांना देतो हाक
आमच्याच घरात घुसायला
अडखळतो उंबऱ्यात तिघे रित्या घराच्या
आठवडाभर सुट्टीसाठी माहेरी आलेली ताई
आज सासरी गेलेली असते
{fullWidth}